विनय वनारसे
तालुका प्रतिनिधी महाड
महाड ग्रामपंचायत चांभार खिड मधील सर्वे न.१४३/ब ७ मधील सोमजाई अपार्टमेंट इमारत राजेंद्र मारुती दळवी आणि श्री बाल्लाजी बिल्डर आणि डेव्हलपर यांचा मार्फत बांधकाम केले असून, सदर इमारतीला मा. जिल्हा अधिकारी अलिबाग यांची ३ मजले परवानगी असताना, इमारती मधील तळमजल्यावर ३ अनधिकृत सदनिकांचे बांधकाम केले आहे. इमारतीच्या तळमज्यालवरील बांधकामाची परवानगी कोणतीही नसताना बांधकाम झाले असून, ग्रामपंचायत मध्ये या बाबध काही माहिती नसल्याच्या सांगण्यात येत असून, ग्रामपंचायत मधून इमारतीला ३ मजले ची परवानगी असून, इमारतीच्या तळमज्यावर अनधिकृत बांधकाम झाले आहे. इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, अनेक ठिकाणी इमारती बाबध इमारती मधील रहिवाशीच्या तक्रारी दाखल आहेत. इमारती मधील तळमजल्यावरील एका अनधिकृत फ्लॅट चे रूपांतर अनधिकृत पण तोडफोड करून दुकान मध्ये करताना इमारतीच्या अधिकृत बांधकाम धोक्यात आले आहे. मा. तहसीलदार महाड याचं काडून पुढील कारवाही लवकरच होणून, अनधिकृत पार्किंग मधले ३ फ्लॅट वरती कारवाही होण्याचा प्रतीक्षेत इमारतीचे रहिवाशी आहेत.