करामत शाह
ग्रामीण प्रतिनिधी, आगर
आगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन बापू देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनात आगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी आज करण्यात आली. एकूण कर्मचारी संख्या, रिक्त पदे, उपलब्द्ध सोयी सुविधा, ऑपरेशन साठी आवश्यक सुविधा, आंबूलन्स, औषधी, रक्त तपासणी, रुग्णांची सोय, स्वछता, सफाई, पाणी,इमारती ची अवस्था, निवासाची व्यवस्था इत्यादी बाबींची तपासणी करून माहिती घेण्यात आली त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन सुभाषराव ताथोड, तालुका सचिव पंकज काळने,प स सदस्य भास्कर अंभोरे, गोपाल भटकर, जि.प सर्कल प्रमुख मनीष बूटे, शुभम भलतीलक, प्रदीप फुकट,प्रवीण फुकट,निलेश घुगरे,विशाल बोपटे,पवन सानगाळे,चेतन फुकट.सर्कल मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.











