तेजस ढाकणे
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव : 14 ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनात होणाऱ्या मराठा समाज योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या सभेस मराठा समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील,स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे, यांच्यापासून सुरू झालेला हा लढा मराठा समाजाची मराठा भूषण मनोज जरंगे यांनी पुढे चालू ठेवला असून,त्यांच्या लढ्याला यश येण्याचे दृष्टीक्षेपत आहे.आतापर्यंतच्या सर्व सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केलेली आहे.मराठा समाज हा प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे त्याची आर्थिक स्थिती हालाखीची आहे मराठ्यांची मुले पैशाभय शिक्षणापासून वंचित आहेत त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे. ही काळाची गरज आहे.एकच मिशन मराठा आरक्षण ही चळवळ पुढे चालू ठेवून सरकारला घाम फोडण्यासाठी सर्वांनी उद्या दिनांक 14 रोजी अंतरवाली येथे आपण मराठा आरक्षण मिळण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी आपली उपस्थिती तिथे आवश्यक आहे.तळागाळातील सर्व समाज बांधवांनो बांधवांनी आंतरवाली येथे सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन महासकल मराठा समाज च्या वतीने गावोगावी जाऊन करण्यात येत आहे.