रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा – अकोला विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बजाज अलीयांस व टाटा चा कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी पोस्टामार्फत सुरू करण्यात आली असून सदर विमा योजनेचा पोस्टातील सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अपघाती विमा योजनेत अपघाती मृत्यू , कायम स्वरूपी अपंगत्व , अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस , अपघातामुळे बाह्यरुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस , दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत दररोज खर्च , मुलांचा शिक्षण खर्च , कुटुंबाला दवाखाना प्रवास , अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च आधी सर्व सुविधा या पॉलिसी अंतर्गत येणार आहेत. पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते अनिवार्य आहे. तरी हिवरखेड येथील पोस्ट ऑफिसच्या सर्व ग्राहकांनी सदरहू अपघाती विम्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उप डाकपाल आशिष ढोकणे यांनी केले आहे. यावेळी डाक सहाय्यक अभिजीत वानखडे , पोस्टमन शालिनीताई पवार , पोस्टमन राजेंद्र भोपळे , यश ढोले ,, मिलिंद वाली व ग्राहक उपस्थित होते.











