सचिन भुसाळे
ग्रामीण प्रतिनिधी, डोंगरगाव
आंध्र व मराठवाड्याच्या सिमावर्ती भागातील यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील दराटी पोलीस स्टेशन अंतर्गत उत्सव काळात शांतता अबाधित राहावी याकरिता ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली दराटी पो स्टे ला दि . रोजी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते .अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दराटी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर यांनी पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक बोलाविली होती . नवरात्रीय शारदोत्सव दुर्गोत्सव व दसरा हे सण उत्सव शांततेत पार पाडले जावे यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील २४ गावांच्या पोलीस पाटलांकडून याबाबत आढावा घेण्यात आला . या 24 गावांपैकी 19 गावांमध्ये दुर्गोत्सव साजरा होणार असल्याची माहिती संबंधित पोलीस पाटील यांनी दिली . यावेळी कुरळी येथील वाल्मीक करेवाड , दत्ता राठोड , शिवदास दंतलवाड या तीन गावांतील सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलां सत्कार करण्यात आला . या शांतता सभेला दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी व पो स्टे अंतर्गत गावांचे पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठीत नागरिक हजर होते .