शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
उमरखेड : ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत
येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेडच्या विद्यार्थिनींनी ओम नसरी बिटरगाव, उमरखेड येथे भेट दिली. रोपवाटिका साहाय्यक रमेश बोरखडे यांनी आंबा खोड कलमसह माहिती दिली. एकाच झाडाकर वेगवेगळ्या प्रकारच्या कलम कशा लावाव्यात आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषिकन्या कल्याणी वि .आंबटकर ,पायल पु. बावणे ,आचल सु. भगत, रेणुका बा. झाडे, वेदांती सं. भडके,क्षितिजा गु. कडु यांनीकलमबांधणी व बडिंग त्यांचे प्रात्यक्षिक पार पाडले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चितले ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रा. वाय. एस वाकोडे तसेच विषयतज्ज्ञ प्राध्यापिका कु.मयुरी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले.










