कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरावर तृणधान्य पाककृती स्पर्धा खेतान सभागृह जि प हायस्कुल संग्रामपूर येथे संपन्न झाली.सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील शालेय पोषण आहार पात्र शाळांनी भाग घेतला होता.यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी एन.जे. फाळके तर प्रमुख अतिथी तहसीलदार योगेश्वर टोंपे गटविकास अधिकारी माधव पायघन प.स.संग्रामपूर हे होते.या शिवाय ये.जी बनसोडे तालुका कृषी अधिकारी, प्रमोद मानकर बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच नवले विस्तार अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर,मिलिंद सोनोने गट समन्वयक,सौ. निमकर्डे मॅडम, मुख्याध्यापक जि. प. हायस्कूल संग्रामपूर हे उपस्थित होते. तालुका स्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक जि. प.म प्रा शाळा तामगाव , द्वितीय क्रमांक कन्या शाळा सोनाळा , तृतीय क्रमांक जिल्हा परिषद कन्या शाळा पातूर्डा बु ह्या शाळांना मिळाला.पुरस्कार विजेते शाळांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच इतर सहभागी शाळांना सहभागी झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले.सदर पदार्थ हे परिपत्रकानुसार तालुकास्तरीय समितीने चव घेऊन पदार्थाची पाहणी करून त्यांना क्रमांक देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरतकार यांनी केले तरआभार प्रदर्शन खंडारे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी संदीप राहाटे शालेय पोषण आहार विभाग,कमलेश गोसावी,सचिन घेवारे यांनी विशेष सहकार्य केले.