शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : तालुक्यामध्ये वडाळी देशमुख येथील पोलीस पाटील हे पद रिक्त असल्यामुळे नेहमीप्रमाणे गावाचा बळीराजाचा मित्र सर्जा राजा मुख्य पोळा सण उत्सवाला गावाच्या पोळा मैदानावर पो.पाटील प्रमोद मुरेकार व पंजाब आळे कोतवाल हे स्वतः तोरण बांधायचे पण यावर्षीला गावाचे पोलीस पाटील व कोतवाल पद रिक्त असल्यामुळे यावर्षी पोळ्याच्या तोरणाला कोणीच वाली नव्हती ऐन पोळा भरण्याच्या वेळेवर गावातील युवा तरुण पिढीने मोठ्या उत्साहाने स्वतः बंगाली काट्या गांजर गवत घालीचे साम्राज्य सपा स्वच्छ करून खताचे ठिकारी बाजूला सारून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर मारून संपूर्ण पोळा मैदान साफ केले व त्या ठिकाणी खांब लावून आंब्याच्या पानांनी तोरणाने पोळा मैदान सजून काढले व गावांमधील बैलांना कमी वेळात तोरण उभारणी करून दिली त्यावेळी गावातील बैलपोळा हा मोठ्या उत्साहाने तरुण पिढीच्या मेहनतीचे साह्याने मोठ्या उत्साहात बैल पोळा आनंदाने सहभागी होऊन भक्तिमय ढपल्यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात व महादेवांच्या गाण्यांच्या गीतात नाचत अग्नीची मशाल व गावातील मानाची बैल जोडी पूजनाला सजून तोरणाखाली हजेरी लावली बैलांच्या सजावट मध्ये म्हणी काही राजकीय पोस्टरबाजी तर काही फिल्मी नावे तर अस्मानी संकटाचा उल्लेख पण रंगरंगोटी च्या माध्यमातून दाखवण्यात आला पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याची मागणी पण गावकरी करीत आहेत बैलपोळ्या तोरणाची पूजन करण्यात आले व पोळा फुटण्याची मशाल पेटवण्यात आली यावेळी आकाश म्हैसने, ऋषिकेश देठे, गोविंद देठे, शंकर चौधरी, गणेश वानखडे, वसंता पिंपळे, सुरज देठे, अक्षय बारब्दे, मनीष बारब्दे, गणेश लोखंडे, हर्षल ठाकरे, सौरभ देशमुख व ट्रॅक्टर प्रदीप बारब्दे तरुण पिढीचे संपूर्ण वर्गातून कौतुक व निस्वार्थी प्रेरणादायी उद्दिष्ट हे दिसून आले आहे.

