आकाश बुचुंडे
ग्रामीण प्रतिनिधी मारेगाव
मारेगाव : वणी तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून सदर बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन आणि संधी न मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून देखील अपेक्षित क्षेत्रात अनेकांना करिअर घडवता येत नाही. म्हणूनच वणी विधानसभा मतदारसंघातील शिक्षित आणि कुशल तरुण तरुणींना यशस्वी करिअर सुरु करण्याची संधी मिळावी या उद्देशाने मनसे पक्ष नेते राजु उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. देशातील ८० पेक्षा अधिक उद्योग, सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे. ५००० पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील युवकांकरिता संधी उपलब्ध झालेली असून विदेही सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज भांदेवाडा येथे नारळ फोडून यांच्या चरणी दिनांक २१ सप्टेंबर पासून फॉर्म भरणे सुरुवात होत आहे. लगेच त्यानंतर उमेदवारांकरीता मुलाखत पूर्व प्रशिक्षणाची सुद्धा सुरुवात होणार आहेत. वणी मारेगाव व झरी तिन्ही तालुक्यामध्ये मुलाखत पूर्व प्रशिक्षण पार पाडल्यानंतर डिसेंबर महिन्यातील ०३ तारखेला रोजगार मिळवायचे आयोजन करण्यात आलेले आहेत सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांना मुलाखत आणि लगेच नियुक्तीपत्र प्रदान करून देशातील नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मनसेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांना सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार असून QR कोड द्वारा उमेदवाराना संपूर्ण नोंदणी फॉर्म भरता येणार आहे व रजिस्ट्रेशन लिंक वरून रोजगार मेळाव्या संदर्भात सविस्तर माहित प्राप्त होणार आहे.युवकांना मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता मुलाखत पूर्व प्रशिक्षणाची आवश्यकता असते त्यामध्ये मुलाखतीचे बारकावे , फॉर्म संदर्भात आवश्यक माहिती तसेच रोजगार मेळाव्यातील संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चमू द्वारा वणी मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यांतील ५० हून अधिक मुख्य गावात वेळापत्रकानुसार पार पाडण्यात येईल सदर वेळापत्रक सुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येत असून युवकांकरिता मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे.