चिफ ब्युरो
विनोद कांबळे
मुंबई : नालंदा एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चेंबूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विद्यार्थ्यांना पश्चिम भारत फुटबॉल संघ (विफा) या संस्थेने फुटबॉल या खेळाच्या माध्यमातून लैंगिक समानता आणि आरोग्य स्वच्छते विषयी जागरूक करण्यात आले. यावेळी महाविद्यालयचे NSS विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पश्चिम भारत फुटबॉल संघाचे अध्यक्ष साउटर वाझ हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक समानता व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले आहे. हा कार्यक्रम शिवाजीनगरमधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पार पडला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे संस्थापक व माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, संस्थेच्या विश्वस्त संगीता हंडोरे, संस्थेच्या सचिव सोनल शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका दिपीका फुलवाडीया आणि सहाय्यक प्राध्यापक मदनलाल पाल सर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.