सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव : तालुक्यातील ढोरजळगाव चे रहिवाशी असलेले राहुल बाळासाहेब फसले यांची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेऊन तसेच माध्यमिक शिक्षण जिजामाता महाविद्यालय भेंडा तसेच पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी घेऊन एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये घवघवीत यश संपादन करून सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय वर्ग दोन या पदी निवड झाली. भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे ग्रंथपाल बाळासाहेब फसले यांचे ते चिरंजीव आहेत. राहुल यांच्या निवडीबद्दल मा.आ. नरेंद्र घुले, मा. आ. चंद्रशेखर घुले, सभापती क्षितिज घुले, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकिसन सासवडे, सरपंच डॉ. सुधाकर लांडे, बापूसाहेब पाटेकर अण्णासाहेब पाटेकर देविदास पाटेकर ढोरजळगाव ने चे सरपंच गणेश कराड अनंता उकिर्डे राजेन्द्र देशमुख, संभाजी लांडे ,बाळासाहेब कराड ,यांनी अभिनंदन केले. गावातील ग्रामस्थ व मित्रमंडळी यांनी राहुल यांची गावातून जंगी मिरवणूक काढली व त्यांचे अभिनंदन केले.