मनोज अग्रवाल
ग्रामीण प्रतिनिधी बावणबीर
भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा कारण, भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेली आहेत.
चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.या निमित्त बावनबीर येथे भाजपाच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला, यावेळी भाजपा जिल्हा सचिव श्याम आकोटकार, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शे.मुबारक, रामदासभाऊ घनोट, नामदेवराव गव्हाळे, संजुभाऊ शेगोकार, मुश्ताक कुरेशी, जनार्दन घायल, मधुकर आकोटकार, ग्रामपंचायत सदस्य शाहरुख खान पठाण,शे.वाजीद, सोसायटी सदस्य नागेश कांबळे तसेच गावातील युवा वर्ग उपस्थित होता.