अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल समिती जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा,अकोला प्रभात किड्स सोमठाणा येथे संपन्न झाल्या.त्यामध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील विद्यार्थिनी १) कु. निशा प्रवीण नाभरे U/14 (33kg) २) कु. अक्षरा अनिल गवई U/14 (58k) ३) कु. सानवी प्रवीण तायडे (मदर इंडिया कॉन्व्हेंट पातुर) वरील विद्यार्थिनींनी कुस्ती (फ्री- स्टाइल) या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर विजय मिळवून विभागीय स्तरावर आपले व शाळेचे नाव नोंदविले आहे. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा फ्री स्टाईल U /14 1) कु.निशा प्रवीण नाभरे वर्ग 8वा (ड) वजन गट 35Kg प्रथम विजयी 2) कु.अक्षरा अनिल गवई वर्ग 8 वा (ड) वजन गट 58Kg प्रथम विजयी 3) शुभम संतोष खरडे वर्ग 8 वा (क) वजन गट 68 Kg प्रथम विजयी कुस्ती ग्रीको रोमन U/17 1) चैतन्य पद्माकर हिंगणे वर्ग 9 वा (ब) वजन गट 48 Kg प्रथम विजयी वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड आहे.डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय पातुर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले व जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी ते पात्र झाले. त्यामध्ये
- ऋतुजा संतोष चव्हाण
- सोनम संतोष राठोड 1) प्रथमेश दादाराव खेडकर 2) लखन श्रीकृष्ण वाघमारे 3) विवेक दिलीप घुगे 4) आनंद गजानन गावंडे विजयी सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक एस आर मूखाडे, डी एम राणे आणि श्री एस आर खाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विजयी खेळाडूचे कौतुक बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमानसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर एस ढेंगे ,पर्यवेक्षिका एम बी परमाळे, जगमोहनसिंह गहिलोत यांनी कौतुक केले.