रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील एक गाव बेलखेड येथील शशांक रमेशराव युतकार एक उत्कृष्ट सुतारकाम करणारा युवक,शिक्षण घेवून इतर कामधंदा करून आपला वंशपरंपरागत व्यवसाय जपत आहेत. वडील रमेशराव युतकार यांच्या कडून तरबेज शशांक डवरे,वखर,रूमणे, बंडी व शेतीसाठी लागणारे साहित्य बनवीत होते, लाकडी शेती औजारे बंद पडल्यावर सुद्धा आजही या व्यवसायात ते टिकून आहेत.ते सद्या लाकडी देवरा, चौरंग व शोकेस मध्ये ठेवण्यात येणारे लाकडी वस्तू, बैल व टुमदार अशी बंडी तयार करून गावात व शहरात जाऊन विकून दोन पैसे कमावल्यापेक्षा वंशपरंपरेने चालत आलेला व्यवसाया ला चालवत आहे. सुतार काम म्हणजे मानवोपयोगी वेगवेगळ्या वस्तु तयार करण्यासाठी लाकडाचा वापर करून त्या वस्तु तयार करण्याची कला म्हणजेच सुतार काम होय. सुतार काम हे आपली कला अधिक प्रगत करण्यास मदत करते. उत्तम कलाकुसर अस लेल्या अतिशय सुंदर, आकर्षक आणि आखीव- रेखीव लाकडी वस्तु बनवितात आणि असे लाकडी वस्तू बनविणाऱ्या व्यक्तीस सुतार असे म्हणतात.सुतार काम हे अगदी पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. सुतार काम पारंपारिक उद्योगधंद्यात येते. बरीच लोकपरंपरागत व्यवसाय म्हणून देखील हा व्यवसाय करत असतात. सुतार काम या परंपरागत व्यवसाय मध्ये अतिशय मनापासून आलेले रमेश भाऊ व शशांक सुतार लाकडाचा वापर करून नवनवीन वस्तु तयार करतात. या लाकडाच्या वस्तु बनवण्यासाठी शशांक वेग-वेगळे प्रकारचे लाकूड वापरत असतात. लाकडाच्या वस्तु बनवण्या साठी रमेश भाऊ व शशांक वेगवेगळ्या प्रकारे रचना करत असतात.


