रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा यांच्या अंतर्गत फळ पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप ) अंतर्गत मौजे खंडाळा येथे शेती शाळा घेण्यात आली. सदर प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील संत्रा व केळी पिकाचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून कीड व रोग व्यवस्थापना करता शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे सदर प्रकल्प अंतर्गत संत्रा पिकाच्या शेतीसाठी खंडाळा गावाची निवड केलेली असून त्यामध्ये संत्रा शेती शाळेचे वर्ग चालू आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक 18/ 8 /2023 रोजी संत्रा शेती शाळेचा वर्ग खंडाळा मध्ये घेण्यात आला. सध्या परिस्थितीत सततचा पाऊस चालू असल्यामुळे व वातावरणा मध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त असल्या कारणाने संत्रा पिकामध्ये फळगळ नियोजन महत्त्वाचे आहे. परिसरामध्ये आंबिया बहराचे फळ हे सध्या विकसनशील अवस्थेत असून मृग बहाराचे फळ हे अगदी लहान आकाराचे आहेत. अशा अवस्थेमध्ये फळगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. संत्रा मध्ये मुख्यते फळगळ ही आंतरिक फळगळ, बुरशीमुळे होणारी फळगळ व किडीमुळे होणारी फळगळ अशा तीन प्रकारचे आढळते या सर्व फळगळीचे विविध प्रकार त्याची कारणे व त्याचे विस्तृत असे व्यवस्थापन त्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी या शेतीसाठी केले,कृषि सहाय्यक मनोज कुमार सारभुकन यांनी फळवाढी साठी संजीव काचा वापर तसेच फाय टॉपथेरा नियोजन, कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी संपूर्ण माहिती, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यावर उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. सदर शेती शाळेकरिता गजानन नागे मंडळ कृषी अधिकारी हिवरखेड, व्ही. एस. वानखडे कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक विठ्ठल बिहाडे, प्रकाश पेठे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.