लक्ष्मीकांत राऊत
शहर प्रतिनिधी परतूर
परतूर : जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त परतूर मंठा तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वाटुर फाटा येथे दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत बीड येथील नामवंत प्रोफेशनल फोटोग्राफर आनंद वाघ यांनी आपल्या व्यवसायात काळानारुप बदल करण्याचे आवाहन केले. परतूर मंठा तालुका फोटोग्राफर आसोशियेशन च्या वतीने वाटुर फाटा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती,यात प्रमुख पाहुणे म्हणून आनंद वाघ बोलत होते. फोटोग्राफी मध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे,या तंत्रज्ञाना सोबत फोटो ग्राफर ने जुळवून घेतले नाही तर तुमचा व्यवसाय चालणार नाही,त्यामुळे तंत्रज्ञान अवगत करा त्याला व्यवसायात उतरवा तरच आपण यात टिकाव धरू शकतो विकास करू शकतो असे वाघ यावेळी म्हणाले.किड्स फोटोग्राफी आणि पोट्रेट फोटोग्राफी याविषयी त्यांनी सविस्तर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. पुरुषोत्तम वायाळ , मामा कदम , वैजनाथ बोराडे , बाबासाहेब तेलगड, बद्रीनाथ खवणे, महेश नळगे, नितीन राठोड, संभाजी वारे ,डॉ. गजानन केशरखाणे, उदय बोराडे , सिताराम राठोड, सुदर्शन सोळुंके ,गजानन चवडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत तालुक्यातील ज्येष्ठ फोटोग्राफर यांचा सत्कार करण्यात आला , कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष शरद खरात, बापू भुतेकर, बाळासाहेब पुणेकर ,अमोल चिंचाने, अमोल सुर्वे ,अजय माने, सुशील खंदारे, प्रकाश तांबे, विकास खरात ,राजेभाऊ गाढवे, प्रमोद काळे ,योगेश खरात ,अनिरुद्ध अँभुरे, ब्रह्मा कोरडे ,कृष्णा धबडकर,हनुमान गंडे,शरद कवडे,भरत चव्हाण,तसेच परतूर, मंठा, तळणी,आष्टी, सातोना, येथील फोटोग्राफर उपस्थित होते