अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
करंजी : लोहसर खांडगाव दि.20 आज सकाळी ठीक नऊ ते साडेबारा कालभैरवनाथ कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचा कार्यक्रम पार पडला व पंचक्रोशीतील भाविकांना प्रसादाचा लाभ दिला गेला. उद्या दिनांक 21/8/2023 नागपंचमीनिमित्त कालभैरवनाथ मंदिरामध्ये पहाटे तीन वाजता पुजारी व कमिटीचे अध्यक्ष व पंचक्रोशीतील भाविक त्यांच्या उपस्थितीमध्ये कालभैरवनाथाची आरती व महापूजा करण्यात येणार आहे . नगर जिल्ह्यातील तसेच सर्व पंचक्रोशीतील लहान थोर मंडळी भाविक भक्तांना सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत मंदिरामध्ये प्रवेश राहणार आहे. नागपंचमी यात्रेनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्क्रीन लावण्यात आले आहेत .लोसर खांडगाव यांच्या वतीने भाविक भक्तांना दर्शन घेता यावे याकरिता पोलीस आणि स्वयंसेवक व्यवस्था करण्यात आलेली आहे .दर्शन रांगेमध्ये पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या रांगा करण्यात आले आहेत. या दर्शनासाठी गोंधळ होऊ नये म्हणून आठ अधिकारी व 25 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहे. गावामध्ये खेळण्याची व वस्तूची खाण्याची दुकाने महाप्रसाद नारळ पानफुल या प्रकारची दुकाने यात्रेमध्ये सामील आहेत. सर्व ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत करण्यात येत आहे.


