प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी : दि.२१ ऑगस्ट माळी महासंघ महाराष्ट्र राज्य परभणी शाखेच्या वतीने पाथरी शहरातील सिटी प्राईड हॉटेल च्या फंक्शन हॉलमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात रविवार दि.२० रोजी बैठक पार पडली. या बैठकी त सर्वानुमते पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यात माळी महासंघ परभणी जिल्हा सरचिटणीस पदी विजय वीरकर, पाथरी तालुकाध्यक्ष पदी विश्वंभर गिराम, मानवत तालुकाध्यक्ष डॉ. संजय हरकळ, सेलू तालुकाध्यक्ष सखाराम कटारे, परभणी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. उद्धव इंगळे, आदींच्या निवड करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीस मराठवाडा विभागीय अध्यक्ष देवनाथ जाधव, जालना जिल्हा अध्यक्ष संतोष रासवे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव आसाराम वीरकर, परभणी जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड, परभणी महानगर अध्यक्ष कैलास माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय करण्यास चालना द्यावी. तसेच त्यांना व्यवसाय करण्यासाठी समाजातील मोठ्या उद्योग व्यवसायिकांनी मदत करावी. यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कैलास माने, प्रा. रासवे, विजय विरकर, आसाराम वीरकर, यांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप जीवनात जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ विरकर यांनी केले तर आभार बी.बी . कोरडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कोरडे, ज्ञानोबा नाळे, गिराम, नंदकुमार गायकवाड, राम गिराम, गणेश आनंदे, अक्षय यादव, नारायण पितळे, सतीश वांगीकर, दामोदर गायकवाड, अँड. अशोक गालफाडे, अतुल कोरडे, बडे नाईक, चिंतामणी गिराम, नबाजी विरकर, रमेश आदींनी पुढाकार घेतला