शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
दिनांक १९/०८/२०२३ रोजी मौजा कोपरा (बू.) येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये गाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी संयुक्त पत्रकार संघाचे तरुण-तडफदार समाजकार्यात सतत अग्रेसर असणारे रितेश पाटील कदम यांची अध्यक्षपदी तर पप्पू लाटे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
आज दिनांक १९/०८/२०२३ रोजी उमरखेड तालुक्यातील मौजा कोपरा (बू.) येथे ग्रामसभा अध्यक्ष सरपंच सौ किरणताई नारायण वडपत्रे, उपसरपंच राजेश्वर पाटील वानखेडे, सचिव बालाजीराव वानखेडे व सर्व सदस्यांचे उपस्थितीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये अध्यक्षपदी तरुण तडफदार व्यक्तिमत्व असणारे संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष रितेश पाटील कदम तर उपाध्यक्षपदी पप्पू लाटे यांची सर्व मते निवड करून सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील पाटील देवसरकर (पोलीस पाटील), उदय पाटील देवसरकर (कृषिधन संचालक),
रोजगार सेवक शिवाजीराव वानखेडे, दादाराव वानखेडे, रंगराव वानखेडे, चक्रधर कदम, सतीश देवसरकर, वशिष्ठ गांजरे, प्रल्हाद वाठोरे, नारायण वानखेडे, दशरथ वानखेडे, भगवानराव वानखेडे, विकास वानखेडे, गणेश राव वानखेडे, आशीर्वाद ठाकरे, डॉक्टर गोपीराज देवसरकर, गजानन काटे, भाऊराव लाटे, तानाजी देवसरकर, साहेबराव काटे, तुकाराम वाठोरे यांचे सह कोपरा (बू.)येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित आणि नव्याने निवडलेल्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष रितेश पाटील कदम यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


