मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
15 ऑगस्ट भारताच्या स्वतंत्र दिवसानिमित्त जवाहर नगर सावरी येथील युनायटेड चर्चमध्ये तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सावरी- जवाहर नगर परिसराच्या ख्रिश्चन समाजाने त्यांच्या युनायटेड चर्चमध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजीत केला. विशेषत: येथे सर्व महिलांनी एकत्र ध्वज फडकावला, तसेच महीला सशक्तीकरणयाची ओळख करून दिली. सर्वानी हर घर तिरंगा घर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपापल्या घरी तिरंगा फडकवला. यावेळी लक्ष्मी राजू, नीता टोपनो नंदा सहारे, सपना डेव्हिड, रुथ सोलोमन, जॅकलिन एक्का, अरुणा वावणे, शोभा डोंगरे, रेखा डोंगरे, शीला चौके, उषा डकोटा, मनीषा वावणे, मेघा वावणे, समिक्षा आदींनी सहभाग घेतला.