डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
हरोली (कोल्हापूर): दि. 16 ऑगस्ट रोजी हरोली येथील भीमक्रांती सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाराष्टातील विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना भारत भूषण गौरव व राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमांसाठी जालना जिल्हाचे माजी आमदार मदनलाल कुलकर्णी,डॉ.सुरेश कुराडे, आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष दिपकभोसले,जेष्ठ पत्रकार तथा कलाकार दगडू माने,कवी सरकार इंगळी,सिने अभिनेत्री अंजली आकळे टी. व्ही. कलाकार प्रशांत बोदगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमक्रांती सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष यांनी प्रस्ताविक सादर केले. प्रास्ताविकात त्यांनी सोशल फाऊंडेशन च्या वतीने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती सादर केली. सांस्कृतीक व समाजिक,शैक्षणिक,क्रीडा,राजकीय, अश्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक मान्यरांना पुरस्कार देण्याचे कार्य मागील 13 वर्षांपासून अविरत पणे चालू आहे. फाउंडेशन च्या माध्यमातून तळागाळातील अनेकांना पुढे आणण्याचा प्रयत्न सातात्याने केला जातो.सांगली जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील, ग्रामीण भागातील मुलगी अंजली आकळे हिने आपल्या सिने करिअर मध्ये कोणी गौडफादर नसतानाही स्वतःच्या हिमतीवर अनेक संघर्ष पार करीत मिस सांगली हा किताब मिळवून स्वतःला सिद्ध केले. टी. व्ही. सिरीयल,लावणी स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक घेऊन विजयी ठरली.तीने अनेक मराठी सिरीयल मध्ये काम केले.त्याच बरोबर अनेक हॉरर चित्रपटाचे लिखाण (पटकथा) केले आहे.स्वतः ची अंजली फिल्म प्रोड्क्शन कं. उभारली आहे. तीने केलेले कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आहेच त्यामुळे त्यांना राष्ट्रीय भारत भूषण गौरव पुरस्काराने प्रमुख पाहुणे माजी आमदार मदनलाल कुलकर्णी,डॉ.सुरेश कुराडे,अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आदी मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे डॉ.सुरेश कुराडे आपल्या भाषणात म्हणाले की,पुरस्काराने माणसाला कार्य करण्याची ऊर्जा प्रदान करत असते.कार्यक्रमाला नंदिनी कदम,खतकर साहेब,नवे दानवाड,चिंदगौड पाटील, सरपंच,सरदार सुतार, कलगौडा पाटील,गावातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमक्रांती सोशल फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.