भागवत नांदणे
सर्कल प्रतिनिधी (वरवट बकाल)
शेगांव : निषाद पार्टी च्या वतीने आज दिनांक 19/08/2023 शनिवार रोजी बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयांवर भोई समाजाच्या धडक मोर्चा बद्दल शेगांव येथील विश्रामगृहात, बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष मारोती बोरवार यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा बांधणीची बैठक पार पडली,तसेच या बैठकीत 12/05/2023 चा तळागाळातील गोर गरीब मच्छिमार भोई समाजाच्या हिताचा शासन निर्णय कायम ठेवावा अन्यथा आंदोलने मोर्चे काढू तसेच आत्मदहनाचा इशारा सुध्दा देण्यात आला , शासनाने याची दखल घ्यावी व मच्छिमार हिताचा 12/05/2023 चा शासन निर्णय कायम ठेवावा असा एकमताने निर्णय घेण्यात आला, व जय निषाद राज निषाद पार्टी जिंदाबाद चे नारे लावण्यात आले, तसेच तळागाळातील भोई समाजाला बुलढाणा येथील मोर्चा मध्ये येण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष दिलीप घट्टे, विदर्भ अध्यक्ष विजय साटोटे, प्रदेश महिला कार्याध्यक्ष शारदा भारसाकळे,प्रदेश आयटी सेल सचिव अंकुश कुरवाळे, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष विजय आमझरे, बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष मारोती बोरवार , बुलढाणा जिल्हा संयोजक रमेश नांदने, संग्रामपूर तालुका उपाध्यक्ष भारत आमझरे, प्रफुल्ल कुरवाळे, आत्माराम मात्रे, श्रीकृष्ण भारसाकळे, समाधान घट्टे, वासुदेव ढोके, रामचंद कुरवाळे, सागर बोरवार, देविदास कुसुंबे, गजानन नेमाडे, विजय मेसरे, रमेश आमझरे, शांतनू आमझरे, विठ्ठल आमझरे, सुरेश आमझरे, अनिल आमझरे, रामकृष्ण पारीसे, संतोष आमझरे, गणेश बोरवार, श्रीकृष्ण आमझरे आदी निषाद पार्टी चे कार्यकर्ते उपस्तीत होते.