महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती दि.19:-शहरातील प्रत्येक समाजाने धानोरकर परिवारावर सतत प्रेम केले आहे. या सर्वांच्या प्रेमापोटीच आम्हाला समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.यापुढेही समाजातील प्रत्येक घटकांसाठी धानोरकर परिवार प्रामाणिक राहून समाजाच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहील असे आश्वासन देत भविष्यातही आमच्यावर असेच प्रेम कायम राहू द्या असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.शहरातील भद्रनाग प्रभागात खासदार तथा भद्रावती नगरपरिषद निधीतून 28 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुस्लिम समाज भवनाचे लोकार्पण मोठ्या थाटात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आ. प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नगरसेवक हाजी शेख, नगरसेविका अनिता मुळे-गेडाम,उपअभियंता आर.एस. गुप्ता, एडवोकेट एम. आर. शेख, हाजी डॉक्टर शकील, बशीर भाईस मजर भाई, मदिना मज्जिद चे मेहबूब खान पठाण तथा पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शहरातील मुस्लिम स्मशानभूमीत शेड उभारण्यासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. या समाजभवणाच्या निर्मितीमुळे परिसरातील गोरगरिबांची आवश्यक ते विविध कार्य या समाजभवनात अगदी अल्प दरामध्ये करणे शक्य होईल असा विश्वास नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी या समाज भावनाच्या निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या अन्य व्यक्तींचा सत्कारही करण्यात. आला सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मुनाज शेख यांनी समाजभवनासंबंधी सविस्तर माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुनाज शेख यांनी केले. याकार्यक्रमाला यश्सवि करन्ययाकरीता ऐजाज अली, ऐयफाज पठान,ईरफान कुरेशी, शकील खान,आकीब खान, नवाज शेख, साहील खॉ, जुनेद शेख, रेहान शेख, रेहान , अफरोज, अकमल, मोहसिन, आसिफ शेख यांचे तर सहकार्य हाजी जावेज, हाजी शाहीदअली,हाजी जाकीर, ईमरान शेख,लाभले.