मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
ढोर जळगाव : बायोस्टड इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे कपाशी व ऊस या पिकावर चर्चासत्र तसेच उत्पादनाविषयी घ्यावयाची काळजी, तसेच किड व रोग नियंत्रण यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले होते. तरी या चर्चासत्रास शेतकरी बांधव उपस्थित होते श्री. महेश पाटेकर, कैलास पाटेकर, बाळासाहेब अकोलकर, दिपक देशमुख, तुषार गिऱ्हे, मधूकर केदार तुकाराम पाटेकर, दीपक गिऱ्हे वसंत गिऱ्हे , बाळासाहेब खवले, दिपक खोसे, गणेश कोल्हे, रविंद्र कराड, गोरक्षनाथ कराड, विजय कराड, विठ्ठल कराड, देविदास पाटेकर, काशिनाथ गिऱ्हे, दिपक काशिद, आदी शेतकरी उपस्थित होते . मा. श्री. अन्वर सय्यद साहेब(बायोस्टड इंडिया लिमिटेड) यांनी सखोल मार्गदर्शन केले व ज्या शेतकऱ्यांनी उत्पादन वापरले त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले व त्यांचा सन्मान करण्यात आला.श्री मनोहर कराड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे आयोजन. श्री दत्त कृषी सेवा केंद्र ढोरजळगाव (अभि काशिद) यांनी केले.