सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण
उरण: स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र दिला घर घर तिरंगा त्या अनुषंगानेऔचित्य साधत उरण तालुक्यातील द्रोणागिरी गडावर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय नवाळे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कार्यकरणी सदस्य महाराष्ट्र राज्याचे रमेश म्हात्रे व तसेच दैनिक अधिकारनामा चे तालुका प्रतिनिधी सतिश गवई आदी उपस्थित होते. वाढत्या औद्योगिकरणामुळे वृक्षांची लागवड कमी झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे मत वकील दत्तात्रेय नवाळे यांनी व्यक्त करीत वृक्षारोपण करण्याचा निश्चय केला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त द्रोणागिरी गडावर १०० झाडांची गडावर लागवड करण्यात आली. यातील काही झाडे जगली तरी आंब्याच्या मोसमात आंबे खायाला मिळतील. असा विश्वास वकील नवाळे यांनी व्यक्त केला.