माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर : तालुक्यातील सावरगाव तांडा येथील राठोड दांपत्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही, पेन, पेन्सिल खोडरबल, इरेझर व पुस्तक वाटप करण्यात आले. दरम्यान सावरगाव तांडा येथील सौ.निकिता विजय राठोड मुंबई विद्यापीठ महिला अधिकारी यांनी सावरगाव तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सावरगाव तांडा येथील पोलीस पाटील विजय राठोड यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला. दरम्यान यावेळी सावरगाव तांडा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.शोभा पवार, निकिता राठोड मुंबई विद्यापीठ महिला अधिकारी, विजय राठोड पोलिस पाटील, मुख्याध्यापक मंदे रुखमाजी, प्रकाश बीबीशन, देविदास कर्डीले, पांडू चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, अविनाश पवार सदस्य, अर्जुन राठोड, भीमराव राठोड, नामदेव जाधव यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोट्या संख्येने उपस्थित होते.