मधुकर केदार
प्रतिनिधी जिल्हा अहमदनगर
जागतिक जैव इंधन दिनाच्या निमित्ताने रणजीत दातिर यांना धरतीपुत्र पुरस्काराने गौरविण्यात आले, भारताला 2030 पर्यंत इंधन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी शेतकरी , सर्वसामान्य जनता, व बेरोजगारांच्या परिवर्तनासाठी अत्यंत अभिमानास्पद काम त्यांनी केल्याने त्यांना धरतीपुत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड मुंबई या कंपनीचे डायरेक्टर, मा,प्राची ढोले मॅडम, डॉक्टर लवेश जाधव सर, आणि सल्लागार डॉक्टर मा,श्याम घोलप सर, यांच्या हस्ते हॉटेल सहारा स्टार मुंबई या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. मीरा क्लीनफ्यूल्स लिमिटेड गेल्या 11 वर्षांपासून जागतिक जैव इंधन दिवस साजरा करीत आहे,भारताला इंधन क्षेत्रात 2030 पर्यंत आत्मनिर्भर करण्या करिता मोठ्या प्रमाणात ग्रामीण पातळीवर कार्य चालू आहे, देशभरातून 300 चे वर उद्दोजक
सहभागी झाले होते, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तयार होणाऱ्या उत्पादनामुळे अहमदनगर जिल्हा बऱ्यापैकी प्रदूषण मुक्त होऊन ,बेरोजगारी मुक्त सुद्धा होईल, व शेतकरी समृद्ध होईल. अहमदनगर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पात तयार होणाऱ्या जैव इंधनच्या (बायो सी.एन जी) बायो कोल व सेंद्रिय खता च्या वापरामुळे वातावरण प्रदूषण मुक्त होईल ,पेट्रोल , डिझेल च्या वापरावर नियंत्रण येईल,त्यामुळे सरकारचे इंधन आयाती साठी जाणारा पैसा वाचेल,तसेच विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी गावा गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिला जाईल व त्यांचे उत्पादन गावातच खरेदी केल्या जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला चांगला मिळेल व नागरिकांना शुद्ध अन्न,शेतीपूरक उद्योगांमध्ये सुद्धा कंपनी आग्रेसर राहील व यातून सुद्धा मोठा रोजगार जिल्हात उपलब्ध होईल. या कार्यक्रमामध्ये जागतिक जैव इंधन दिवसाच्या निमित्त साधून संपूर्ण भारतातून आलेल्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला असून लवकरच त्यांच्या प्रकल्प उभारणी करिता सुरवात केली जाणार आहे.ऑगस्ट 2024 पर्यन्त बायो कॉल चे134 प्रकल्प आणि बायो सीएनजी चे 50 प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट एम,सी, एल कंपनीचे आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील 7 तालुक्यातील युवा उद्योजकांना सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला त्यामध्ये रणजीत दातिर , संदीप दातीर (श्रीरामपूर),सुरेश धवण(पारनेर) राजेंद्र गायकवाड(शेवगाव). भाऊराव चावरे(नेवासा),सागर घुगरकर(राहुरी), राजेंद्र उदवंत (राहता) जितेंद्र वरे (अकोले) अहमदनगर जिल्ह्यातून यावेळी उपस्थित होते.


