दशरथ गायकवाड
तालुका प्रतिनिधी मेहकर
पूर्ण आई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित पूर्ण अकॅडमी व पूर्ण इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष. श्री सचिन राठोड सर यांच्या नेतृत्वाखाली 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रथम पूर्ण इंग्लिश स्कूलमध्ये प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाला शाळेतर्फे फेटा वाटण्यात आला. मुख्याध्यापिका मॅडम यांच्या देखरेखेखाली मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा. विद्यार्थी पालक व फेटा हे त्रिकोण अतिशय शोभनीय होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका. सौ. सीमा जाधव मॅडम तसेच शिक्षक वृंद यांनी खूप मेहनत घेतली. नंतर गावातून प्रभात फेरी अतिशय आनंदाने उत्साहाने. वाजत गाजत व मोठ्या संख्येने पालकांच्या व प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत काढण्यात आली. ग्रामपंचायत जवळ सर्व शाळा शिक्षक वृंदावन ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच यांनी ध्वजारोहण संपन्न केले.











