सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण
उरण: उरण न्यायालयात लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन होणार असल्याची माहिती उरण वकील संघटनेचे अध्यक्ष ॳॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.उरण तालुक्यातील रुपये पाच लाख रकमेच्या वरील दिवाणी दाव्यामधील पक्षकार आणि त्यांचे वकील यांना पनवेल येथे येण्या- जाण्याकरिता होणारा त्रास वाचविण्यासाठी उरण येथे वरिष्ठ न्यायालय स्थापन होणे गरजेचे झाले होते.तशी मागणी होत होती. वरिष्ठ न्यायालयामध्ये उरण, पनवेल, कर्जत व खालापूर येथील ४ न्यायालयाचे दिवाणी दावे, दिवाणी अर्ज, भूसंपादनाचे अर्ज यांच्याविषयी कामकाज चालत असते. त्यामध्ये अधिकाधिक काम उरण तालुक्यामधून आलेले असते. गैरसोय टाळण्यासाठी उरण येथे वरिष्ठ न्यायालयाची स्थापना होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन उरण न्यायालयाचे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकरणीने ठराव मंजूर करून हा ठराव जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्या कडे पाठविला होता.











