अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर दि : 15 ऑगस्ट 2023 रोजी नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १ मध्ये सकाळी साडेसात वाजता प्रवीण पोहरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला.यावेळी समीक्षा वानखडे, सविता पोहरे, वैशालीताई बोंबटकार, प्रवीण मधुकर पोहरे,ललिता शिरसाठ , सदस्य शाळा व्यवस्थापन समिती श्री नवनीत वानखडे असंख्य पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक एन.बी.झाडोकार, कु.स्वाती जोशी,अनिता भगत ,कु स्वाती गाडगे, सुरेखा राठोड, सहाय्यक शिक्षिका यांनी सहकार्य केले, त्यांना खाऊ वाटप करून प्रभात फेरी काढून नगरपरिषद कार्यालय मध्ये ध्वजारोहण करण्यात आले.