अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील इयत्ता दहावी मध्ये तालुक्यातून प्रथम आलेल्या वैष्णवी भारतासे या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सपनाताई म्हैसने,सचिव सचिन ढोणे, यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ सदस्य, पालक वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर संगीत शिक्षक सुधाकर उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मेरी माटी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत शाळेने विविध उपक्रम राबविले त्याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी यावेळी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये शाळेतील जवळपास 800 विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.प्रभात फेरी एवढी भव्य होती की प्रभात फेरीमुळे पातुर शहर अक्षरशा दणाणून गेले होते लहान मुलांची ही प्रभात फेरी म्हणजे जाज्वल देश प्रेमाच ते प्रतीकच होतं. स्वदेश प्रचारासाठी मुलांची प्रभात फेरीच्या माध्यमातून देशभक्ती देशप्रेम यावेळी दिसून आले.यावेळी गावातील नागरिकांनी मुलांचे कौतुक केले तर काही सामाजिक संघटनांनी चिमुकल्यांची सेवा म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय, चॉकलेट वाटप तर काहींनी प्रभात फेरीत सहभाग नोंदवलेल्या कर्मचारी व नागरिकांची चहापान्याची सुद्धा व्यवस्था केली. यात गुरुवार पेठ येथील गजानन गाडगे, लोकसेवा बिछायत केंद्र व साउंड सर्विस, अंबादास देवकर, विलास देवकर यांचा समावेश होता.ही प्रभात फेरी शाळेतून निघून पोलीस स्टेशन चौक -गुरुवार पेठ- चिरा चौक -भगत वेटाळ -तेलीपुरात चौक- गुजरी लाईन -बाळापुर वेस -सिदाजी वेटाळ मार्गे शाळेत येऊन समारोप झाला. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना ध्वज संहिता व ध्वजाचे महत्त्व सांगितल्या गेले.प्रभात फेरी दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी पोलीस बंदोबस्त देऊन सहकार्य केले तर मुलांना चॉकलेट वाटप करून कौतुक सुद्धा केली.यावेळी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या प्रभात फेरीला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.











