रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अंतर्गत तळेगाव बाजार येथे कापूस पिकाबाबत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये कापूस पिक अंदाजे 45 ते 50 दिवसाचे झाल्या बरोबर पात्या फुलाचे बारकाईने निरीक्षण करावे निरीक्षणांची डोमकळ्या किंवा अर्धवट उमललेली फुले ताबडतोब अळीसह नष्ट करावे तसेच कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणाकरिता प्रति एकरी तीन ते चार कामगंध सापडे लावावेत व कीड व्यवस्थापना करिता एकरी आठ ते दहा कामगंध सापडे लावावे. काम गंध सापडे पिकाच्या उंचीच्या सहा इंच वर लावावे. गुलाबी बोंड अळीचा प्राथ मिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलां डल्यास पाच ते दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त पात्या फुले ( डोमकळ्या ) किंवा अर्धवट उमललेली फुले आढळल्यास निंबोळी अर्क 1500 पीपीएम 50 मिली व प्रोफेनोफॉस 50 ई सी 30मिली किंवा क्विनॉल फॉस 25 ए एफ 35 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. व ज्या शेतकऱ्यांचे कपाशी पीक अद्याप पर्यंत फुल पात्यावर आले नाही त्यांनी सुद्धा 5. टक्के निंबोळी अर्काची सुरक्षा म्हणून फवारणी करावे. या बाबत ची माहिती कृषी सहायक मनोज कुमार सारभुकन यांनी दिली.प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, माननीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी ची माहिती कृषी सहायक महेश इंगळे यांनी दिली सदर कार्य क्रमाला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.कापूस पिक 45 ते 50 दिवसाचे झाल्याबरोबर नियमित सर्वेक्षण करावे व किडीने आर्थिक नुकसानी ची पातळी ओलांडल्यास शिफारस केलेल्या कीटक नाशकाचीफवारणीकरावी. सध्या अमावस्येचा काला वधी असल्याने पीक संरक्षणा करिता पिकावर शिफारस असलेल्या कीटकनाशकाची त्वरित फवारणी करावी,गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी तेल्हारा.











