सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड दि 15 :- भारतीय स्वातंत्र्या दिनाचा 76 वा वर्धापन दिन उमरखेड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. 15ऑगस्ट हा राष्ट्रीय सण विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा केला तहसिल कार्यलयाच्या पटांगणात आयोजित मुख्य कार्यक्रमात मा. उपविभागीय कार्यकारी अधिकारी डॉ. व्यकंट राठोड यांनी ध्वजारोहण केले. या नंतर पोलिस निरीक्षक , यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने मा. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यकंट राठोड यांना मानवंदना दिली. मानवंदना नंतर साहेबराव काळे शहीद जवानाची पत्नी सत्वशिला साहेबराव काळे यांचा उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ध्वजारोहणाच्या मुख्य शासकिय सोहळ्यादरम्यान विद्यमान आ. नामदेवराव ससाने माजी आ. प्रकाश पाटील देवसरकर, माजी आ. विजयराव खडसे , तहसीलदार डॉ.आनंद देउळगांवकर ,एस. डी.पी. ओ. प्रदिप पाडवी , पोलीस निरीक्षक शंकर पाचाळ न. प. मुख्यकार्यकारी अधिकारी महेश जामनोर नायब तहसीलदार व्ही व्ही पवार, नायब तहसीलदार एस. डी. पाईकराव , नायब तहसीलदार आर एम पंधरे,नायब तहसीलदार पी.पी.कावरे, स्वंतत्र संग्राम सैनिक प्रतिष्ठीत नागरिक ,शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, तलाठी, तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.