माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर येथे शहरातील टिपू सुलतान चौक येथे अलमंड गार्डन हॉलमध्ये सभेच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिंतूर येथे एम आय एम पक्षातर्फे जिंतूर येथील टिपू सुलतान चौक अलमल गार्डन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष डॉक्टर गफार कादरी, फिरोज लाला, परभणीचे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट इम्तियाज खान, उपस्थित होते .यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात जिंतूर नगरपालिका निवडणूक ताकदीने लाडू असा इशारा दिला. व पक्षाला मजबूत करण्यासाठी जोमाने काम करण्याची सल्ला पण दिली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिंतूरचे तालुका अध्यक्ष सय्यद रियाज भाईमिया, तसेच एमआय पक्षाचे शहराध्यक्ष नय्युम पठाण, आदिने काम पाहिले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे ,यांच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.