अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : बाळदी तांडा वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन हा प्रभात फेरी काढून साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी नाऱ्याचा जल्लोष करून गावातील लोकांना देशप्रेमाचा संदेश दिला त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर राठोड यांच्या हस्ते ७:३० वाजता शाळेमध्ये ध्वज फडकविण्यात आला यावेळी शाळेतील कैलास पाटील सर, निता दुधे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. व सर्वाचे सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे सरपंच प्रदीप शिरडकर उपसरपंच अरविंद हरण माजी सरपंच सौ विमलबाई टिपरे माजी उपसरपंच साहेबराव पाटील मिराशे अविनाश वटाणे, बालाजी वानखेडे, अंबादास वायकुळे, कुंडलिक दुधे, अंकुश मिराशे, विनोद हरण, शामराव टिपरे, प्रल्हाद दुधे, बेबीबाई राठोड, दत्ता देशमाने इतर ग्रामस्थ उपस्थित होते


