रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे भारताचा स्वातंत्र्य दिन पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी मॉर्निंग स्टार मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. प्रमोदजी चांडक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमोद चांडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांद्वारे वेगवेगळी देशभक्तीपर गीत व देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले . यानंतर सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड चे प्राचार्य चंद्रकांत तिवारी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अर्मृत महोत्सव हा सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे देश सेवेसाठी गेलेल्या जवानांच्या पालकांचा सत्कारसोहळा आयोजित करण्यात आलाजवळपास वीस भारतीय जवानांच्या आई वडिलांचा व त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. त्यानंतर क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थ्या नी आपल्या शाळेचे नाव संपूर्ण तालुक्यामध्ये मोठे केले त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार यावेळी अध्यक्षां च्या वतीने करण्यातआला. कार्यक्रमाच्यl सर्वात शेवटी अखंड भारत ही अवि स्मरणीय अशी नाटिका इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले . प्रमोद चांडक यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती व आपला देश या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया व उपाध्यक्ष लूनकरण डागा यांनी शुभेच्छा दिल्या.











