रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना अंतर्गत मौजे खेलदेशपांडे ता तेल्हारा येथे तूर पीक व्यवस्थापन या विषयवार डॉ. मुरली इंगळे प्रकल्प संचालक आत्मा अकोला, गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी, यांचे मार्गदर्शन खाली शेतीशाळा आयो जित करण्यात आली. शेतीशाळा मध्ये रासायनिक खते व सूक्ष्म मूलद्रव्ये व्यवस्थापन या विषयावर श्री रविंद्र माळी मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री दिपक मोगरे यांनी नैसर्गिक शेती बाबत माहिती दिली. शेतीशाळेला डी टी बळे साहेब कृषीपर्यवेक्षक, मेघ साहेब कृषी सहायक, जाफर कलेखा ग्राम पंचायत सदस्य, पंकज खाडे व शेतकरी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)