रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा= दिनांक 9 ऑगस्ट रोजी झालेल्या आदिवासी दिनाचे औचित्य साधून तेल्हारा तालुका कृषी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा आत्मा वतीने रानभाजी महोत्सव सोमवार रोजी सकाळी १०.०० वाजता तेल्हारा पंचायत समिती परिसरात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन तेल्हारा पंचायत समिती सभापती सौ.आम्रपाली गवारगुरु यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून कीशोर मुंदडा उपसभापती पंचायत समिती ,अमित कुमार मुंडे गटविकास अधिकारी, गौरव राऊत तालुका कृषी अधिकारी , संजय हिवराडे गटनेता पंचायत समिती, कैलास चंद्र भोजने, श्री जी डी नागे मंडळ कृषी अधिकारी , सीमा कोरडे मंडळ कृषी अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थित होती. पावसाळा सुरू झाला की शेतात रानावनात शेकडोने रान भाज्या उगवतात जसे करटोली, कुंजीर ची भाजी ,शेरनी, मुंगटी , गुळवेल ,शेवगा, तांदूळ जीरा,तरोटा ,वाघाडे
,फांजीची भाजी ,इतर अधिक रानभाज्यांचा समावेश होतो. रानभाजी यशस्वी होण्यासाठी तालुका कृषी विभागातील सर्व कृषी पर्यवेक्षक, सर्व कृषी सहाय्यक, व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोगरे तालुका तंत्रज्ञान व्यव स्थापक तर आभार प्रदर्शन रवींद्र माळी मंडळ कृषी अधिकारी यांनी केले
प्रास्ताविक करताना तालुका कृषि अधिकारी गौरव राऊत यांनी विविध रानभाज्याची ओळख करून दिली त्याचप्रमाणे राणभाज्याचे आरोग्या साठी असलेले महत्व विषद केले.