रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
वारखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सौ. सुमित्राताई रमेश उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात केंद्रप्रमुख मनीष गिर्हे सर ,ताळे सर ,
सौ. व्यवहारे मॅडम , सौ. खंडारे मॅडम, सौ. बावणे मॅडम, कार्तिक सर, वारखेड येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, शाळाव्यवस्थापन समिती , व गावकरी मंडळी उपस्थित होते.याप्रसंगी गावकऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


