कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आज मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023 जिल्हा परिषद मुलींची कन्या शाळा सोनाळा येथे ध्वजारोहण करून युवा सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या हस्ते सैनिक स्तुप चे अनावरण करण्यात आले.यामध्ये भारत मातेच्या वेशभूषेत कु.ईश्वरी दिलीप आखरे सोबत सर्वांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या. जिल्हा परिषद मुलींची कन्या शाळा येथून विद्यार्थिनीची रॅली गावामधून ग्रामपंचायत येते नेण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच हर्षल खंडेलवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जि.प.मुलींची कन्या शाळेमध्ये कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री.भास्कर सर सह इतर शिक्षक उपस्थित होते.