सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि . १३ ऑगस्ट २०२३ बीड जिल्ह्यातील मनरेगा घोटाळा प्रकरणातील ग्रामविकास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई घोटाळ्यातील अधिकारी शासनाच्या रडारवर
बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई ,केज , परळी वैजनाथ तालुक्यांमध्ये पंचायत समितीच्या आणि ग्रामपंचायत मार्फत मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात अनेक कामे चालतात २०११ ते २०१९ दरम्यान बीड जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत कामाची अंमलबजावणी करताना बोगस कामे आणि कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकार उघडकीस आले असून याप्रकरणी जिल्ह्यातील ३६ अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली आहे तर बीड जिल्ह्यातील तब्बल ५०१ ग्रामविकास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी चालू असून मनरेगा घोटाळा प्रकरणातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सध्या शासनाच्या रडारवर आहेत. या प्रकरणाने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील मनरेगा घोटाळा प्रकरणी जनहित याचिका दाखल केल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाकडून २०२१ या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या कामगारांची नोंद मनरेगात करण्यात आली होती तर काहींना रोख रक्कम देवू करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडून याप्रकरणी कोणतीही चौकशी आणि कारवाई करण्यात आली नाही म्हणून त्यांची जिल्हाधिकारी पदावरून बदली करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील मनरेगा घोटाळा प्रकरणातील कोट्यावधी रूपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने बीड जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी मनरेगा कर्मचारी सध्या शासनाच्या रडारवर आहेत.


