फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतूर प्रतिनिधी: जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच बिनविरोध निवड राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी जुन्नर तालुका प्रभारी अध्यक्षपदी भरत अस्वार उपाध्यक्षपदी गोपीनाथ शिंदे तर तालुका सचिव पदी दुष्यंत बनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सर्व सभासदांना रेनकोट वाटप करण्यात आले.यावेळी राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव यांचा सत्कार शाल,श्रीफळ व क्रांती दिनाच्या औचित्य साधून पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रविंद्र भोर व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके यांचे शुभहस्ते करण्यात आला.मुंजाबा डोंगराच्या पायथ्याशी व धूरनळी या धबधब्याच्या जवळ निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्रीरंग फार्म्स च्या सभागृहात आयोजित मीटिंग मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास- राव आरोटे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर,जिल्हा संपर्क प्रमुख अशोक डेरे,मनोहर हिंगणे,नवनिर्वाचित प्रभारी जुन्नर तालुका अध्यक्ष भरत अस्वार,उपाध्यक्ष गोपीनाथ शिंदे,सचिव दुष्यंत बनकर, कार्याध्यक्ष विजय चाळक, इलेक्ट्रॉनिक मीडिया उपाध्यक्ष कैलास बोडके जेष्ठ पत्रकार चंद्रकांत औटी आदी पत्रकार उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर यांनी तर आभार जिल्हा संपर्क प्रमुख अशोक डेरे यांनी मानले.