रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा=अत्यंत जीर्ण झालेले मातीचे घर, घरात अठरा विश्व दारिद्र्य, उपजीविकेसाठी मजुरी शिवाय कोणतेही साधन नाही , अशा अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत हिवरखेड येथील सुरेश ढगे यांचा परिवार जगत आहे. सुरेश ढगे यांचा मुलगा ओम शेतातील साध्या माती पासून सुंदर सुरेख गणपती, महादेव, श्रीराम अशा विविध देवी देव तांच्या मुर्त्या सहज साकारतोय. नैसर्गिक रंगापासून त्यांना आकर्षक स्वरूप प्रदान करतो. या कामी त्याला त्याचा भाऊ धनंजय व बहीण ममता ढगे हे दोघे सुद्धा खांद्याला खांदा लावून आवश्यक मदत करतात. अशा या गुणी कलावंताला मदतीची गरज आहे. ओम हा सध्या 12 वी चे शिक्षण पूर्ण झाले असून तो 18 वर्षाचा आहे. पण या चिमुकल्या ओम ला लहान पणा पासूनच मूर्ती कलेचा छंद लागला असून, मूर्तींकरिता लागणारे साचे नाहीत, कोणाचेही मार्गदर्शन नाही, आधुनिक उपकरणे नाहीत ,अवजारे नाही, आर्थिक पाठबळ नाही, घरातील कोणत्याही व्यक्तीला मूर्ती कलेचा कोणताही अनुभव नाही, तरी हा चिमुकला सहज देवी देवतांच्या मुर्त्या साकारतो. सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्यांमुळे जल प्रदूषणात अत्यंत वाढ झाल्याने तसेच सदर प्लास्टिक ऑफ पॅरिस च्या मुर्त्या लवकर विर घळत नसल्याने नदी व समुद्रकाठी त्या मूर्तींची खंडित अवस्थेत अजान तेपणाने का होईना पण एक प्रकारे वितंबनाच मानवा द्वारे होत असते. त्यामुळे प्लास्टिक ऑफ पॅरिस च्या मुर्त्या नियोजित शाडू माती अथवा चिकन मातीच्या गणपती मूर्ती वापरण्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जन जागृती होताना दिसत आहे. आणि या जन जागृतीचा दूत म्हणूनच एक प्रकारे ओम हा मातीचे मूर्ती कलेचे कार्य करत आहे.ओमला हवी तुमची मदतशिक्षण पूर्ण करण्यासोबतच ओम चे मूर्ती कलेत करिअर घडविण्याचे स्वप्न आहे. पण हलाखीची परिस्थिती, गुरूंच्या मार्गदर्शनाचा अभाव आणि रिकामा खिसा या समस्या
चिमुकल्या ओम व त्याच्या कुटुंबीयांना भेडसावत आहे. आपल्या मुलाच्या कलागुणांना पंख मिळावे व त्याने खूप मोठे नाव करावे अशी अपेक्षा आमच्या पालकांना सुद्धा आहे.