भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर -अन्नदानामुळे अधिकमास बहरला राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांची माहिती अधिकमासत धोंड्याला केवळ जावाई मंडळी सारुरवाडीला धोंडे जेवण घेऊन तृप्त होत असतात परंतु धर्मकारण करणारे माहुर च्या आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती द.भ.प. सद्गुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी अधिकमास महीन्याच्या प्रारंभापासून दररोज हजारो भाविक भक्तांना धोंड्याचा महाप्रसाद मिष्ठान्न भोजनासह वितरीत करुन माहुर शहर व परिसरातील वासीयांना चुल बंद आमंत्रण दिले होते. आता येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यदिनी अन्नदान महाप्रसादाची सांगता होणार असून अधिकमास समाप्तीच्या महाप्रसादास किमान ४०ते५० हजार भाविक महाप्रसादास येथील अशी अपेक्षा राष्ट्रसंत द.भ.प. सद्गुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी व्यक्त केली आहे १५ऑगस्ट रोजी महाप्रसाद सकाळी १०ते रात्री १०पर्यंत वितरीत करण्यात येणार असून तसे जाहीर निमंत्रण भाविक भक्तांना व शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे असे प्रसीध्दी पत्रकात म्हटले आहे निसर्ग समृद्धीच्या कुशीत वसलेल्या आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधिपती यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पासून प्रेरणा घेऊन संत बिळगीर महाराज स्वच्छता मोहिम राबविली असुन या शिवाय सहा महिन्यांपूर्वी वाघा बॉर्डर जवळ सात दिवस शुर जवानांच्या प्रवचन कीर्तन केले राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या प्रवचनाने प्रेरीत होऊन वाघा बॉर्डर जवानांनी आधीकमास समाप्तीचा महाप्रसाद त्यांच्या मार्फत महाप्रसाद देण्याचे मनोदय व्यक्त केले होते. त्यामुळे धर्म अर्थ काम मोक्ष या चार ही बाबींचा प्रतीसंगम वसमतकर मठात सर्वधर्मीय नागरीक कर्मचारी वृंद विद्यार्थी ईष्टमीत्रासह व परीवारासह भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान आनंद दत्त धाम आश्रमाचे प्रसिद्धी प्रमुख जयकुमार अडकीने नंदु संतान यांच्या सह भक्त मंडळाकडून करण्यात आले .










