डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
सेलू: दि 9 ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील फुलेनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्य ‘हात मदतीचा’ सामाजिक उपक्रमा अंतर्गत शहरातिल दानशुर व्यक्ति च्या सहकार्याने 51 विद्यार्थास शालेय साहित्य वाटप करण्यात आले.9 ऑगष्ट क्रांतीदिनानिमित्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस साईराज बोराडे,कवी गौतम सुर्यवंशी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, महिला मंडळ सचिव ललिता गिल्डा, संयोजक सुनिल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांनी केले ते म्हणाले कि कै. दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रेरणेतुन सुरू असलेला ‘हात मदतीचा’ उपक्रम हा मागील पाच वर्षांपासून अविरत सुरू असून या वर्षी उपक्रमास सहा वर्ष पूर्ण झाले असून आत्तापर्यंत शहरातील २३३४ विद्यार्थ्यांपर्यंत हात मदतीचा या उपकर्मातून शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे.तर या वर्षांपासून महाविद्यालीन एक पालक आणि गरजुवंत विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.हा हात मदतीचा उपक्रम हा शहरातील दानशूर नागरीकांचा आहे.असे प्रतिपादन संयोजक सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविकात केले.
या कार्यक्रमास साईराज बोराडे,गौतम सूर्यवंशी, ललिता गिल्डा, निर्मला लिपणे , पि. के. शिंदे,शुकाचार्य शिंदे,आदिनी मनोगत व्यक्त करत स्तुत्य उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक थोरे यांनी केले तर यशस्वीतेसाठी शिक्षक, कर्मचारी आदिनी परिश्रम घेतले.


