सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जहागीर) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.361खड्ड्यामध्ये टाकलेल्या मुरूम माती धुळीमुळे नागरिकांच्या प्रगतीला धोका वाढला आहे. संबंधित प्रशासनातर्फे सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जात आहे.याकडे लोकप्रतिनिधींदुर्लक्ष करीत असून संबंधित प्रशासन खड्ड्यामध्ये माती मुरूम मस्त दिसून मार्गी चे प्रश्न निर्माण झाले आहे. इथून जात असलेला नागपूर तुळजापूर हायवे महामार्ग सर्विस रोड वर पडलेल्या खड्ड्यामध्ये जमा झालेल्या मातीचे धुळ रोड लगत असलेल्या नागरिकाना अत्यंत त्रास होत आहे. या रोडवर जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिना अत्यंत त्रास सहन करावा लागतो ये- जा करणाऱ्या -नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो डोळ्यात जात मातीचे कण जात असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.धूळ डोळ्यात गेल्याने वाहना व लक्ष विचलित होत असून अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिक या धुळीमुळे. अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. सुकळी जागीर परिसरात सध्या पावसाने उघड दिली असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. आता नागरिकांना धुळीच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे.या रखडलेल्या रोडचे काम पूर्ण करण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.