मधुकर केदार जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव ,पाथर्डी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस, तूर ,सोयाबीन, मूग ,बाजरी ,मटकी ,उडीद पिके घेतली जातात. गेले दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पावसाच्या आशेने पावसाची वाट पाहत आहेत. गेले दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे पिके कोमजू लागले आहेत. काही शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी सावकाराकडून पैसे काढून लागवड पेरणी केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक खते घेऊन ठेवले आहेत. परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातातुन जाऊ राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. काही ठिकाणी 70 ते 80 टक्के पिके पावसाअभावी जळुन चालले आहेत. तरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने पंचनामे करून तात्काळ हेक्टरी शासकीय अनुदान जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपध्यक्ष दत्ता भाऊ फुंदे यांनी केली आहे.


