भरत बिरंगळ
ग्रामीण प्रतिनिधी,पुणे
चाकण :कै.भागूबाई पिंगळे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व जगदंब प्रतिष्टान जुन्नर,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि -7 ऑगस्ट 2023 रोजी ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर पार पडले.शिबीरासाठी शिरूर मतदारसंघाचे खासदार मा.डॉ अमोल कोल्हे याचे स्वीय सहाय्यक मा तेजस झोडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रक्तदान विषयी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.ढेरे आर.व्ही यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन केले सदर शिबिराच्या माध्यमातून 31 बॅग्स एवढ्या रक्त साठ्याचा संचय करण्यात आला तर रक्तदान करनाऱ्या रक्तदात्यास जगदंब प्रतिष्ठाण कडून 6 लाख एवढे विमा कवच, रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त पुरवठा इत्यादी सुविधा देण्यात आल्या. सदर शिबिरा साठी संस्था अध्यक्ष डॉ.एन डी पिंगळे ,संस्था सचिव एस एस टिळेकर,प्राचार्य डॉ ढेरे,उपप्राचार्य बुट्टे एस एच, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य दुधवडे डी आर , इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज चाकणच्या डायरेक्टर वाळवेकर शुभांगी,इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापीका मंगळूर अर्चना, महाविद्यालयातील रा.से.यो कार्यक्रम अधिकारी शिंदे गणेश तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक/प्राध्यापिका व सेवकवर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जैद केतन व आभार प्रा तांबोळी जावेद यांनी केले.