अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : तुलंगा बु. – पंचायत समिती पातुर अंतर्गत येणाऱ्या तुलंगा बु!! या गावांमध्ये रमाई घरकुल योजना तसेच पंतप्रधान घरकुल योजना व शेळी गोठा योजना अशा ज्या काही योजना रोजगार हमीच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व योजनांमध्ये घोटाळा दिसून आलेला आहे.
ज्याचे ज्यांचे घरकुल आहे त्यांना त्याचा निधी तर बऱ्या पैकी प्राप्त झाला आहे परंतु यांच्या व्यतिरिक्त जो घरकुल योजनेमध्ये मिळत असलेला रोजगार हमीचा पैसा लाभार्थ्यांना न मिळता पं.स पातुर येथील रोजगार हमीच्या अधिकाऱ्यांकच्या साहाय्याने तो पैसा लाभार्थ्यांच्या परस्पर काढून घेतला हे दिसून आले असता तुलंगा बु!! येथील सर्व लाभार्थी ज्यांच्या सोबत हा सर्व प्रकार घडला ते सर्व १ ऑगस्ट २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीचे तडफडदार युवा नेतृत्व जि.प उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्या दालनात झालेल्या प्रकरणात न्याय मांगण्या साठी गेले व तिथे सुनील भाऊंनी रोजगार हमीच्या संबंधीत सर्व अधिकाऱ्याना तत्काळ त्यावर चौकशी करण्याचे आदेश देऊन दि ७ ऑगस्ट २०२३ रोजी तुलंगा बु येथे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जनता दरबारचे आयोजन करून लोकांच्या सोबत झालेला सादर प्रकार हा सर्व लोकांच्या समोर संबधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून सदर प्रकानावर न्याय देनाच काम सुनील फाटकर यांनी केले आहे तरी १ ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रार करणाऱ्या लोकांना दिलासा देऊन नवीन तक्रारी वर पुन्हा अधिकाऱ्यांना आदेश देऊन लवकरात लवकर सदर प्रकरणातील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन लोकांचे पैसे त्यांच्या खात्यात परत देऊन त्यांना न्याय द्यावा असे या जनता दरबारतून सुनील फाटकर यांनी सुचविलेले आहे.


