प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी, पाथरी
पाथरी : शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेसाठी “क्ष किरण”(एक्स रे) मशीन कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती रुग्ण कल्याण समिती सदस्य सदाशिव थोरात व वैद्यकीय अध्यक्ष डॉ. सुमंत वाघ यांनी दिली. ग्रामीण सह शहरी भागातील नागरिकांनी रुग्णसेवेसाठी या मशीनचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्याचे आरोग्य विभागाचे क्षेत्र लक्षात घेता. मागील तीन वर्षांपूर्वीच कोरोना काळात पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना सदाशिव थोरात यांनी पाथरी ग्रामीण रुग्णालया क्ष-किरण (एक्स रे) मशीन उपलब्ध करण्यासाठी ठराव घेऊन कागदोपत्री मागणी केली त्यानंतर सदरील मशीन ही ३०-३-२०२२ रोजी जिल्हा रुग्णालय परभणी मार्फत मे. अलेन्जस मेडिकल सिस्टम, मोहाली, पंजाब यांच्याकडून प्राप्त झाली होती. पण मशीन कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या थ्री फेज विद्युत पुरवठा, लीड सीट व सी. आर. सिस्टम इत्यादी साहित्याची आवश्यकता होती. सदरील साहित्याच्या पुरवठ्याबाबत वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा वरील साहित्याचा पुरवठा होण्यास विलंब होत होता, विद्युत पुरवठा व लीड शीट ची कामे मार्च २०२३ मध्ये झाली होती. परंतु सी आर सिस्टीमचा पुरवठा झालेला नसल्यामुळे जुलै २०२३ मध्ये पूर्ण कल्याण समितीच्या झालेल्या बैठकीत सदरील बाब आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिली असता, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सदाशिव थोरात यांनी संबंधित मुंबई येथील पुरवठाधारक विभागाशी चर्चा करीत, त्यांना चांगलेच धारेवर धरले व लवकरात लवकर सी. आर. सिस्टम उपलब्ध करून दिला.२ ऑगस्ट रोजी पाथरी ग्रामीण रुग्णालयात क्षकिरण (एक्स-रे) मशीनचा सर्व ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी रुग्ण सेवेसाठी लाभ घेण्याच्या वाहन समितीचे सदस्य सदाशिव थोरात, वैद्यकीय अधीक्षक सुमंत वाघ ,क्ष -किरण तंत्रज्ञ विष्णू टेकाळे, डॉ. जाधव, डॉ. कोल्हे संगणकीय परिचालक टेकाळे आदींनी केले आहे.


